आकर्षण – अंगदुखी

अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …


सप्तपदी कादंबरी

आकर्षण     


अंगदुखी

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीची अनामिक काळजी आपल्याला काय देते – आजारपण. अर्थात, प्रेम करण्यामध्ये प्रिय व्यक्तीची काळजी आलीच. आठवणी, विरह व अव्यक्तता यांतून एक गोष्ट समांतरपणे घडत असते. ती म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष. खरंच, प्रेमात वाहून जाणं इतकं आवश्यक असतं का?


तिचे जास्त झोपल्यामुळे अंग दुखणे आणि आईला अशक्तपणामुळे भोवळ येऊन पडणे यांचा ती संबंध जोडू लागली. तिला त्याचे नवीन कपड्यांतील ते देखणे व्यक्तिमत्त्व आठवले. काल सकाळनंतर तो दिवसभर न दिसल्याने तिची तगमग झाली होती. त्याचे ते हास्य तिला स्पष्ट आठवत होते.


आणि, त्याच्या त्या अनोख्या रूपाचे तिला आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


पाऊलखुणा – ओसाड


हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …

हिंदोळा कविता संग्रह – पाऊलखुणा


ओसाड


तप्त ऊन, निर्जन रस्ता.

शोधात तुला, मी फिरस्ता.


कुंपण तारांचे, उगाच उभे.

सहवास तुझा, न लाभे.


खाण्यास गर्दी, उदास चेहऱ्यांची.

नजरही त्यांची, कुणास शोधती.


झाड वाळलेले, दिसते भकास.

आठवण तुझी, हृदयास त्रास.


रस्ता संपलेला, तलाव आटलेला.

भास तुझा, नजरेस झालेला.


फुलझाडे सुकलेली, उन्हात होरपळती.

भंगलेले प्रेम, आस तुझी.


ओसाड जागा, मनास खुणवती.

डोळ्यात पाणी, फक्त तुझ्यासाठी.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी – https://pragandh.in/

* All Copyright Reserved *


 

“सप्तपदी” – प्रदोष १७


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”           

रंग – “आकर्षण”


प्रदोष १ठेच”       

प्रस्तावना


आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्याला काळजी का वाटते, याची अनेक कारणे सांगता येतील. परंतु काही घटना अशा असतात, जिथे आपण पूर्णपणे हतबल ठरतो. घटना घडून जाते; आणि मागे उरते ती फक्त काळजी.


त्याला मुका मार लागल्याचे तिला जाणवत होते; पण तो शांत होता. वेदना होत असूनही तो त्या चेहऱ्यावर उमटू देत नव्हता. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो फक्त हसला.


आणि, त्याच्या त्या सहनशीलतेचे तिला विलक्षण आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रदोष १६


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”           

रंग – “आकर्षण”


प्रदोष १घड्याळ”          

प्रस्तावना


जीवनातील काही घटना आपल्याला सर्वार्थाने बदलून टाकतात. सगळ्याच गोष्टी बदलत जातात. त्यातून मनात एक धास्ती निर्माण होते. आपली प्रिय व्यक्तीही बदलली, तर काय होईल, हा प्रश्न सतावू लागतो. परंतु तसे न घडणे, हा जीवनातील एक अमृतयोगच असतो.


माडीवरील वातावरणातील बदल आणि दिवाणखान्यातील थांबलेले घड्याळ यांचा ती अर्थ लावू लागली. तो मात्र नाश्त्याची वाट पाहत एका खुर्चीवर खाली मान घालून बसला होता. त्याच्यात मात्र कोणताच बदल झाला नव्हता. इतके दिवस उलटूनही तो तसाच होता — शांत, हसरा आणि आज्ञाधारक.


आणि, त्याच्या न बदलण्याचेच तिला विशेष आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“हिंदोळा” – कविता – “जाणीवा”


हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …


हिंदोळा (मराठी कविता संग्रह)

(भाग १५)


“जाणीवा”


मला पाहताना,

तू थोडीशी लाजली होतीस.

मीही तुला आवडल्याची,

जाणीव तुझ्या लाजण्यात होती.


माझ्याशी बोलताना,

तू थोडीशी अडखळली होतीस.

माझ्या अनामिक आकर्षणाची,

जाणीव तुझ्या अडखळण्यात होती.


माझ्यासह हसताना,

तू स्वप्नात हरवली होतीस.

माझ्या स्वर्गीय सहवासाची,

जाणीव तुझ्या हरवण्यात होती.


मी निघताना,

तू थोडीशी गहिवरली होतीस.

माझ्यावरील अबोल प्रेमाची,

जाणीव तुझ्या गहिवरण्यात होती.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी –

https://pragandh.in/

* All Copyright Reserved *


 

“सप्तपदी” – प्रदोष १५


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”              

रंग – “आकर्षण”


प्रदोष १प्रवाह”       

प्रस्तावना


प्रिय व्यक्ती सोबत असताना मन बेफिकीर असते. जणू हे नाते निरंतर आहे, असे आपण गृहीत धरत असतो; पण काहीतरी घडते आणि ती प्रिय व्यक्ती अवतीभवती दिसेनाशी होते. त्यात कोणाला विचारण्याचीही सोय नसल्यास मन चलबिचल होते. आणि मानसिक स्थैर्य ढासळून भावनिक अस्थिरता निर्माण होते.


शेतात फेरफटका मारत असताना तिला पाटातून पाणी वाहताना दिसले. ते दृश्य पाहताच तिला स्वप्नातील नदीच्या पलीकडील काठावर उभा असलेला तो आठवला. तिच्या मनात एक हलकीशी धास्ती निर्माण झाली. काहीतरी घडणार असल्याची जाणीव तिला होऊ लागली.


आणि, त्याच्या विरहाचेही तिला एक वेगळे आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रदोष १४


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”        

रंग – “आकर्षण”


प्रदोष १४ – नखे”           

प्रस्तावना


घडणाऱ्या घटना आणि आपली समज यांत अनेकदा फरक असतो. आपल्या भोवती अडचणी आणि संकटे उभी राहतात; परंतु त्यात एखादी व्यक्ती आपल्याला साथ देत असते. ती व्यक्ती भावनिक आधार वाटू लागते. आणि हळुवारपणे, आश्चर्याचे रूपांतर आकर्षणात होत जाते.


चहा घेऊन वरती तिच्या खोलीत आल्यावर तिला कागदात गोळा केलेली नखे दिसली. रात्री नखे कापण्याचा प्रसंग आणि भावाचा अज्ञातवास यांचा संबंध ती जोडू लागली. तितक्यात तिला तो सायकलवरून माडीकडे येताना दिसला. त्याचा साधेपणा तिला आवडू लागला होता.


आणि, त्याच साधेपणाचे तिच्या निरागस मनाला आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रस्तावना


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग – “आकर्षण”


प्रस्तावना


एखाद्याचे प्रेम रंगणार असेल, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणतात. नियतीचा हा खेळ अजब रीतीने सतत चालूच असतो. घडणाऱ्या घटना आणि अंतरी बदलणारे भाव यांचा विलक्षण मिलाफ कधीमधी पाहावयास मिळतो. अधुऱ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी दोन जीवांची जन्मोजन्मी गाठ पडत असावी, असे वाटते.


ती ऐश्वर्याचा उपभोग घेणारी युवती असते; तर तो तिच्याकडे चाकरी करणारा भोळसट युवक असतो. तिचे प्रदोषव्रत आणि त्याची भेट यांची सुरुवात एकाच दिवशी होते. अपशकुनांच्या घटना घडत असतानाच त्यांच्या प्रेमाचा खडतर, पण गुलाबी प्रवास सुरू होतो.


तिच्या प्रेमाचे रंग बदलत असताना तीही अनाहूतपणे बदलत जाते. तिचे निर्णय आत्मघातकी ठरत जातात. घडणारा प्रकार त्याच्या आकलनापलीकडचा असतो; तरीही तो प्रत्येक गोष्टीत तिची साथ देत राहतो.


आणि एका क्षणी, ज्याला प्रेमाची पूर्तता किंवा पुनर्जन्म म्हणता येईल, ते येऊन पोहोचतात.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रदोष १३


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”       

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष १३ – “झाड”         

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीची सोबत असताना खरे तर कशाचेच भान राहत नाही. आपण काय करीत आहोत, हेही वेड्या मनाला समजत नाही. कित्येकदा प्रत्यक्षात आपणच आपल्या गुलाबी प्रवासात अडथळे निर्माण करीत असतो. बरं, ते केवळ एकट्याने केलेले नसते. आपल्या प्रिय व्यक्तीनेही त्यात तितकीच मोलाची भर घातलेली असते.


त्याच्या सोबतीने दुपारी लिंबाचे रोप अंगणात लावताना ती स्वप्नात विहरत होती. ती मात्र स्वतःच्या धुंदीत होती. त्याची सोबत तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली होती. पण, कातरवेळी अंगणात असताना तिला भावाच्या राजीनाम्याची बातमी कळली.


आणि, त्या लिंबाच्या रोपाकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या सोबतीने हरवून जाण्याचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

 *All Copyrights Reserved*


“हिंदोळा” – प्रदोष १२


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”           

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष १२ – “झाडू”      

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीपाशी व्यक्त होणे; आणि, त्या व्यक्तीने सर्वकाही स्वीकारणे, याला तोड नसते. मुळात बोलताना आपण आपली प्रिय व्यक्ती दुरावू नये, यासाठी प्रयत्न करीत असतो; पण, बऱ्याचदा आपण त्यांना गृहीत धरतो. व्यक्त होण्याची चुकीची पद्धत आत्मसात करतो; आणि अनाहूतपणे दुराव्याचा प्रवास सुरु करतो.


तिला घाम फुटला होता. भावाच्या चुकीमुळे तिच्या वडिलांना मोठा भुर्दंड भोगावा लागला होता. थोडी शांत झाल्यावर दार लोटण्यासाठी ती दरवाज्यापाशी आली. तेथे तिला उभा ठेवलेला झाडू दिसला.


आणि, त्या झाडूकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या आकर्षणाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*