“सप्तपदी” – प्रदोष १४


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”        

रंग – “आकर्षण”


प्रदोष १४ – नखे”           

प्रस्तावना


घडणाऱ्या घटना आणि आपली समज यांत अनेकदा फरक असतो. आपल्या भोवती अडचणी आणि संकटे उभी राहतात; परंतु त्यात एखादी व्यक्ती आपल्याला साथ देत असते. ती व्यक्ती भावनिक आधार वाटू लागते. आणि हळुवारपणे, आश्चर्याचे रूपांतर आकर्षणात होत जाते.


चहा घेऊन वरती तिच्या खोलीत आल्यावर तिला कागदात गोळा केलेली नखे दिसली. रात्री नखे कापण्याचा प्रसंग आणि भावाचा अज्ञातवास यांचा संबंध ती जोडू लागली. तितक्यात तिला तो सायकलवरून माडीकडे येताना दिसला. त्याचा साधेपणा तिला आवडू लागला होता.


आणि, त्याच साधेपणाचे तिच्या निरागस मनाला आकर्षण वाटू लागले.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रस्तावना


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग – “आकर्षण”


प्रस्तावना


एखाद्याचे प्रेम रंगणार असेल, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणतात. नियतीचा हा खेळ अजब रीतीने सतत चालूच असतो. घडणाऱ्या घटना आणि अंतरी बदलणारे भाव यांचा विलक्षण मिलाफ कधीमधी पाहावयास मिळतो. अधुऱ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी दोन जीवांची जन्मोजन्मी गाठ पडत असावी, असे वाटते.


ती ऐश्वर्याचा उपभोग घेणारी युवती असते; तर तो तिच्याकडे चाकरी करणारा भोळसट युवक असतो. तिचे प्रदोषव्रत आणि त्याची भेट यांची सुरुवात एकाच दिवशी होते. अपशकुनांच्या घटना घडत असतानाच त्यांच्या प्रेमाचा खडतर, पण गुलाबी प्रवास सुरू होतो.


तिच्या प्रेमाचे रंग बदलत असताना तीही अनाहूतपणे बदलत जाते. तिचे निर्णय आत्मघातकी ठरत जातात. घडणारा प्रकार त्याच्या आकलनापलीकडचा असतो; तरीही तो प्रत्येक गोष्टीत तिची साथ देत राहतो.


आणि एका क्षणी, ज्याला प्रेमाची पूर्तता किंवा पुनर्जन्म म्हणता येईल, ते येऊन पोहोचतात.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी” – प्रदोष १३


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”       

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष १३ – “झाड”         

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीची सोबत असताना खरे तर कशाचेच भान राहत नाही. आपण काय करीत आहोत, हेही वेड्या मनाला समजत नाही. कित्येकदा प्रत्यक्षात आपणच आपल्या गुलाबी प्रवासात अडथळे निर्माण करीत असतो. बरं, ते केवळ एकट्याने केलेले नसते. आपल्या प्रिय व्यक्तीनेही त्यात तितकीच मोलाची भर घातलेली असते.


त्याच्या सोबतीने दुपारी लिंबाचे रोप अंगणात लावताना ती स्वप्नात विहरत होती. ती मात्र स्वतःच्या धुंदीत होती. त्याची सोबत तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली होती. पण, कातरवेळी अंगणात असताना तिला भावाच्या राजीनाम्याची बातमी कळली.


आणि, त्या लिंबाच्या रोपाकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या सोबतीने हरवून जाण्याचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

 *All Copyrights Reserved*


“हिंदोळा” – प्रदोष १२


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”           

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष १२ – “झाडू”      

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीपाशी व्यक्त होणे; आणि, त्या व्यक्तीने सर्वकाही स्वीकारणे, याला तोड नसते. मुळात बोलताना आपण आपली प्रिय व्यक्ती दुरावू नये, यासाठी प्रयत्न करीत असतो; पण, बऱ्याचदा आपण त्यांना गृहीत धरतो. व्यक्त होण्याची चुकीची पद्धत आत्मसात करतो; आणि अनाहूतपणे दुराव्याचा प्रवास सुरु करतो.


तिला घाम फुटला होता. भावाच्या चुकीमुळे तिच्या वडिलांना मोठा भुर्दंड भोगावा लागला होता. थोडी शांत झाल्यावर दार लोटण्यासाठी ती दरवाज्यापाशी आली. तेथे तिला उभा ठेवलेला झाडू दिसला.


आणि, त्या झाडूकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या आकर्षणाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“हिंदोळा” – प्रदोष ११


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”        

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष ११ – “कावळा”               

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीचा आवाज सतत कानांत गुंजत राहतो. त्यातील माधुर्य आणि बोलण्याची शैली मनाला हवीहवीशी वाटते. संवादातून ती प्रिय व्यक्ती आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनत जाते. बोलण्यातील चढउतार अनेक गोष्टींचे सूचक ठरतात. अर्थात, त्यांचा योग्य रीतीने अर्थ लावणे, यातच आपल्या समजुतीची खरी कसोटी लागते.


नाही म्हटले तरी माडीला आज एक कलंक लागला होता. बदनामी आणि चौकशीच्या चक्रव्यूहात तेथील माणसे अडकू लागली होती. ती दिवाणखान्यातून बाहेर आली, तेव्हा तो मख्खपणे उभा होता. इतक्यात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट आणि त्यात मिसळलेली कावळ्याची कावकाव तिच्या कानावर आली. त्या अनपेक्षित आवाजाने ती क्षणभर थबकली;


आणि, त्याच्या भांबावलेल्या अवस्थेचा ती आश्चर्याने विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“हिंदोळा” – कविता – “कोपरा”


हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …

हिंदोळा (मराठी कविता संग्रह)


भाग १६ – ९ “कोपरा”


मनाच्या कोपऱ्यात आता,

निरोप तुझा जपणार आहे.

आयुष्य नकाराचे आता,

यानंतर मी जगणार आहे.


मनाच्या कोपऱ्यातील आता,

सवय तुझी पुसणार आहे.

अग्निपरीक्षा विरहाची आता,

यानंतर मी देणार आहे.


मनाच्या कोपऱ्यात आता,

आठवण तुझी साठवणार आहे.

लपवण्यास अश्रू आता,

यानंतर मी शिकणार आहे.


मनाच्या कोपऱ्यात आता,

नाते तुझे जोपासणार आहे.

समजूत मनाची आता,

यानंतर मी घालणार आहे.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी – https://pragandh.in/

* All Copyright Reserved *


 

“सप्तपदी” – प्रदोष १०



अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”        

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “पाणी”           

प्रस्तावना


प्रिय व्यक्तीचा सहवास लाभणे म्हणजे स्वर्गीय आनंद होय. सोबत असताना अनेकदा काहीतरी संस्मरणीय घडावे, अशी लहर मनात दाटून येते. त्या वेळी उत्साहाच्या भरात अनावश्यक आगाऊपणा घडतो आणि प्राप्त झालेल्या सुवर्णक्षणांची रंगत हरपते. थोडक्यात, ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असा प्रकार आपण अजाणतेपणाने करीत असतो.


एक मोठा श्वास घेत ते तिला म्हणाले, “पोरी, विपरीत घडले बघ. कुक्कुटपालन कारखान्यातील आर्थिक ताळमेळ बिघडल्याने मोठा तोटा झाला आहे. तो सावरण्यास किमान तीन वर्षे लागतील.” हे ऐकताच तिला पिंपळाच्या झाडापाशी त्याने उच्चारलेले शब्द आठवले. तिच्या मनात धस्स झाले.


आणि, पिंपळाला पाणी घालण्याच्या त्या चुकीची आठवण होताच ती आश्चर्याने त्याच्या भाबडेपणाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


 

“सप्तपदी – प्रदोष ९”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “शिंक”           

प्रस्तावना


दूर असताना आपल्या प्रिय व्यक्तीची होणारी भेट म्हणजे आनंदाची पर्वणी असते. भेट होणार हे कळल्याच्या क्षणापासून मन मोहून जातं. कित्येक गोष्टीची तयारी आपण करत असतो. त्यातल्या त्यात आपण किती टापटीप राहू, याचाही प्रयत्न असतोच; पण, ठरलेली भेट काही कारणास्तव टळल्यास मनातील घालमेल मात्र काही केल्या थांबत नाही.


ती निघण्याच्या तयारीने खोलीबाहेर पडत असताना दरवाजापाशी जोरात शिंकली. तितक्यात पुन्हा दूरध्वनी वाजला. त्यांची आजची भेट रद्द झाली होती. आनंदाच्या क्षणांना स्वल्पविराम भेटला होता.


आणि, त्या दूरध्वनीकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या अचूकतेचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष ८”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “सोने”            

प्रस्तावना


आपण छान दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं. विशेषतः प्रिय व्यक्ती सोबत असताना, आपण तसा प्रयत्नही करत असतो; पण, यात कधीतरी आपलंही काहीतरी चुकतच. मग, अनाहूतपणे आपली प्रिय व्यक्ती मदतीचा हात पुढे करते; आणि, पुन्हा-पुन्हा चुकत राहावं, असं मनाला वाटून जातं.


सबुरीने घेण्यासाठी तिचे वडील काहीतरी बोलणार, तितक्यात तो तिथे आला. तिच्याकडून हरवलेली सोन्याची कुडी त्याने त्यांच्या हातात दिली. माडीसमोरील अंगणात त्याला ती सापडली होती. त्यांनी मोकळा श्वास घेत ती सोन्याची कुडी तिला दिली.


आणि, त्या अलंकाराकडे आश्चर्याने बघत ती त्याच्या विचारात हरवून गेली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष ७”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “मंगळ”          

प्रस्तावना


एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसणं. त्यात अगदीच प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण होणं. याला एक प्रकारे दुग्धशर्करायोगच म्हणता येईल. प्रिय व्यक्तीपाशी प्रेम व्यक्त करण्याची शक्यता धुसर होत असतानाच, दैवयोगाने आणखी कालावधी मिळाल्यास, ती एक अनोखी पर्वणी असते; आणि, जणूकाही आपला जन्म याच व्यक्तीसाठी झाला असल्याचं वाटून जातं.


बहिणीच्या साखरपुड्यानंतर तीही गुलाबी विश्वात हरवून गेली होती. पत्रिकेतील मंगळ व इतर कारणामुळे तिचं लग्न लांबणीवर पडलं होतं. त्यामुळेही ती आणखी निर्धास्त झाली होती; कारण, त्याला समजून घेण्यासाठी तिला पुरेसा वेळ मिळणार होता.


आणि, उगाचच आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाकडे आश्चर्याने पहात असताना ती त्याच्या विचारात हरवून गेली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*