हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …
हिंदोळा (मराठी कविता संग्रह)
भाग १६ – ९ “कोपरा”
मनाच्या कोपऱ्यात आता,
निरोप तुझा जपणार आहे.
आयुष्य नकाराचे आता,
यानंतर मी जगणार आहे.
मनाच्या कोपऱ्यातील आता,
सवय तुझी पुसणार आहे.
अग्निपरीक्षा विरहाची आता,
यानंतर मी देणार आहे.
मनाच्या कोपऱ्यात आता,
आठवण तुझी साठवणार आहे.
लपवण्यास अश्रू आता,
यानंतर मी शिकणार आहे.
मनाच्या कोपऱ्यात आता,
नाते तुझे जोपासणार आहे.
समजूत मनाची आता,
यानंतर मी घालणार आहे.
– प्रशांत सिनलकर
पुस्तके व अधिक वाचण्यासाठी – https://pragandh.in/
* All Copyright Reserved *
❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻