“सप्तपदी – प्रदोष ६”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”              

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “सुतक”        

प्रस्तावना


आयुष्याचा प्रवास हा मोठा गुंतागुंतीचा असतो. एखादी गोष्ट मिळवताना अनेक अडथळे येऊ शकतात; पण, ती गोष्ट मनापासून हवी असेल तर आपण कशाचीही तमा करीत नाही. कधीकधी आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवताना येणारे विघ्न एक विशिष्ट संकेत देत असतात; कारण, ती गोष्टच नियतीच्या दृष्टीने चुकीची असते.


विपरीत घडलं होतं. तिच्या वडिलांच्या चुलत्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं होतं. त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनी तिच्या वडिलांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बातमी ऐकताच अश्रू अनावर झाल्याने तिची बहिण तिच्या खोलीत निघून गेली. सुतक पडल्यानं सभारंभ रद्द करावा लागल्याचं एव्हाना तिला लक्षात आलं होतं.


आणि, मयतीचा निरोप घेऊन येणाऱ्याकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या अचूकतेचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष ५”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”             

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “फडफड”             

प्रस्तावना


चुकीच्या रेशीमगाठी जुळून येऊ नयेत, असं म्हणतात, तसं काही झाल्यास त्याला “विनाशकारी विपरीत बुद्धी” असंही म्हणता येईल. वरवर योग्य वाटणार नातं कधीकधी आयुष्याच्या अधोगतीच कारण होऊ शकतं; पण, मंतरलेल्या मनाला ते उजमत नाही; आणि, मिळणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करून जीवनाला उध्वस्त करण्याची वाटचाल सुरू झालेली असते.


पाहण्याचा कार्यक्रम संपण्याची वेळ जवळ आली होती. स्वयंपाकघरात कपाटातील चहाचे कप काढण्यासाठी तिने दरवाजा उघडला. तितक्यात तिचा उजवा डोळा फडफडू लागला. कप घेतल्यानंतर तिने कपाट बंद केलं. कप धुण्यासाठी जाताना वाटेत तिला आरसा दिसला.


आणि, आपल्या उजव्या फडफडणाऱ्या डोळ्याकडे आरशात आश्चर्याने पाहत ती अंधकारमय भविष्याचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष ४”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”             

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष ४ – “तहान”        

प्रस्तावना


असं म्हणतात, आजारपणात प्रिय व्यक्तीची गरज अधोरेखित होते. मन आणि शरीर जेव्हा साथ देत नाही, तेव्हा त्या व्यक्तीचा आधार अमूल्य असतो. त्या व्यक्तीचा सहवास औषधइतका जालीम उपाय करीत असतो. यामुळे भावनांचे बंद दृढ होतात; आणि, मनातील प्रेमाचा बहर फुलून येतो.


ती त्याच्याकडे भावनिकदृष्ट्या ओढली जाऊ लागली. तिच्या समर्पित सेवेने तीन दिवसातच तिचे वडील ठणठणीत बरे झाले. त्यांच्या माडीवरची मरगळ झटकली गेली. त्याला त्यांनी सायकल बक्षीस दिली. तिला मायेने त्यांनी शाबासकी दिली.


आणि, तिच्या वडिलांकडे आश्चर्याने पहात ती त्याच्या चांगुलपणाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष ३”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष – “आडवं”          

प्रस्तावना


एखादी आवश्यक गोष्ट कधीकधी घडून येत नाही. मग, यामागेही नियतीचा काहीतरी खेळ असावा, असं वाटून जातं. बहुतेक, भविष्यात आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होण्यासाठी तसं होणं, विधिलिखित असावं. असं म्हणतात, नातं मानण्यावर असतं. तसंच, प्रेमही योग्य वेळेची वाट पाहत निभावण्यावर असतं.


गाडीतील बिघाड त्याच्या लक्षात आला होता. गाडीचं इंजिन थंड करण्यासाठी तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला. वेळ भराभर निघून चालला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर गाडी सुरु झाली. तितक्यात विहिरीपाशी तिला ती काळी मांजर दिसली.


आणि, त्या मांजरीकडे आश्चर्याने पाहत ती परिक्षेच्या बुडालेल्या विषयाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष २”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”        

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष २ – “निखारा”        

प्रस्तावना


प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेले असतात, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आपली प्रिय व्यक्ती समोर असताना वास्तवतेचा आपल्याला विसर पडलेला असतो. त्या व्यक्तीप्रती प्रेमाचा पाझर फुटतो. कधीकधी त्या व्यक्तीचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो; आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातले निखारे बाजुला करण्याचा प्रयत्न करतो.


ती पुरती घाबरली होती. बंबाच्या जाळीतील निखारे उडाल्याने ती जोरात ओरडली. तोपर्यंत त्याने ते तीन-चार निखारे हातानेच उचलून बाजूला टाकले. त्याचा उजवा तळहात चांगलाच भाजला होता. तिचा आवाज ऐकताच तिचे वडील धावत त्याच्याजवळ गेले.


आणि, त्याच्या भाजलेल्या तळहाताकडे आश्चर्याने पाहत ती त्याच्या भोळेपणाचा विचार करू लागली होती.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“सप्तपदी – प्रदोष १”


अपशकुनांच्या संकेतातून रंगणाऱ्या प्रेमाची शोकांतिका …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग १३ – “सप्तपदी”         

रंग १ – “आश्चर्य”


प्रदोष १ – “माती”           

प्रस्तावना


दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती पहिल्यांदा भेटणं, हा अपघात असतो का नियतीचा खेळ? सांगणं तसं कठीण आहे; पण योगायोग म्हणा किंवा साधारण घटना म्हणा, ह्या आपल्याभोवती घडत असतात. प्रिय व्यक्तीची पहिली भेट आठवण्याचा प्रयत्न केल्यावर, त्यात एक अजब ऊर्जा जाणवते; कारण, त्या व्यक्तीप्रती आपल्या निरागस भावना जोडलेल्या असतात.


तिनेही हा सगळा प्रकार पहिला होतं. तिच्या धांदरटपणामुळे कुंडी कठड्यावरून जास्त पुढे सरकली होती. त्यानच तिच्या भावाने घात केला असता; पण दिनूमुळे अनर्थ टळला होता. त्याच्या बोलण्यात खरंच तथ्य असल्याचं तिला जाणवलं.


आणि, फुटलेल्या कुंडीकडे आश्चर्याने पाहताना ती त्याच्या निरागसपणाचा विचार करू लागली.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी :

https://pragandh.in/

*All Copyrights Reserved*


“जन्मांतर – उपभाग २५”


हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …

हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)


भाग २ – “जन्मांतर”    

उपभाग २५ – “अमावस्या __:__


प्रस्तावना


जन्मोजन्मी एखादी व्यक्तीच आपल्या सोबत असावी, असं वाटणं म्हणजेच बहुतेक प्रेम असावं, जीवापाड प्रेम केल्यास, तीच व्यक्ती आपलं आयुष्य जगण्याचं गमक असते. आपलं सुख-दु:ख, यश-अपयश, आणि आशा-निराशा यांचा खेळ त्या व्यक्तीभोवातीच घुटमळत असतो. त्या व्यक्तीची सोबत असणं म्हणजे स्वर्गीय आनंदाची लयलूट असते; आणि त्या व्यक्तीचं अस्तित्व म्हणजेच आपल्या जीवनाची ओळख असते.


असं वाटतं, प्रेमाला खरंच एका विशिष्ट चाकोरीत बांधता येत नाही. समर्पणाची वृत्ती तयार करण्याची क्षमता प्रेमातच आहे. प्रेमासाठी जन्मांतराची वाट पाहणाऱ्या तिला मुक्त करण्यासाठी आज मी गडावर निघालो आहे. बहुतेक अनिश्चित काळासाठी …


पण, रहस्यमय अस्तित्वातून सर्वस्व विसरायला लावणारी तिच्या निस्सीम प्रेमाची ताकद, हे माझ्यासाठी शेवटपर्यंत अनाकलनीय होतं.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी –

www.pragandh.wordpress.com

* All Copyrights Reserved *


“Confusion – SP12”


The journey of presumed love is always an unresolved mystery …


Oscillation (English Novel)

Part 2 : “Confusion”


Subpart 12 : Emociones”               

Preface


Understanding the emotions is one part of realization. However, feeling and living the emotions of a loved one is beyond happiness. The existence of a loved one makes you emotional. Whether you are laughing, crying or keeping silent, have the same meaning. It is an exchange of love leading to an unknown destiny.


Meeting her at home was a memorable day. We grab a coffee made by me. We listen to music, read books, and prepare food together. It was like both of us were lost in the world of love.


How do we realize the emotions of love? By expressing or feeling – I don’t know.


– Prashant Sinalkar


For books and more :

www.pragandh.wordpress.com

*All copyrights reserved*


“हिंदोळा – कविता – समर्पण”


हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …

हिंदोळा (मराठी कविता संग्रह) (भाग १५)


“समर्पण”


न चुकता नेहमीच काढतोस तू,

जेव्हा वेळ माझ्यासाठी.

लकेर सुखद अंतरात माझ्या,

तेव्हा उमटते तुझ्यासाठी.


विनातक्रार समजून घेतोस तू,

जेव्हा चुका माझ्यासाठी.

आर्त प्रिती हृदयात माझ्या,

तेव्हा उमलते तुझ्य्साठी.


न लपविता कडवट सत्ये तू,

जेव्हा सांगतोस माझ्यासाठी.

विचार आधाराचा मनात माझ्या,

तेव्हा रुजतो तुझ्यासाठी.


निरागस आणाभाका प्रेमाच्या तू,

जेव्हा घेतोस माझ्यासाठी.

भावना समर्पणाची काळजावर माझ्या,

तेव्हा कोरते तुझ्यासाठी.


– प्रशांत सिनलकर


पुस्तके व अधिक वाचण्यासाठी – http://www.pragandh.wordpress.com

* All Copyright Reserved *


“Confusion – SP11”


The journey of presumed love is always an unresolved mystery …


Oscillation (English Novel)

Part 2 : “Confusion”


Subpart 11 : Enfermedad”               

Preface


Your feelings become miserable when your loved one is not well. They need your support to get back to routine life. But you are so emotional that it makes you uncomfortable. This feeling of caring is nothing but love. That is always out of your control.


Once again, my father made me comfortable with his sayings. Her absence at the Institute made me somewhat impatient. I was happy after visiting her home. Her presence made me comfortable.


Why do we care about someone? For holding or love – I don’t know.


– Prashant Sinalkar


For books and more :

www.pragandh.wordpress.com

*All copyrights reserved*