हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी …
हिंदोळा (मराठी कविता संग्रह)
(भाग १५)
“जाणीवा”
मला पाहताना,
तू थोडीशी लाजली होतीस.
मीही तुला आवडल्याची,
जाणीव तुझ्या लाजण्यात होती.
माझ्याशी बोलताना,
तू थोडीशी अडखळली होतीस.
माझ्या अनामिक आकर्षणाची,
जाणीव तुझ्या अडखळण्यात होती.
माझ्यासह हसताना,
तू स्वप्नात हरवली होतीस.
माझ्या स्वर्गीय सहवासाची,
जाणीव तुझ्या हरवण्यात होती.
मी निघताना,
तू थोडीशी गहिवरली होतीस.
माझ्यावरील अबोल प्रेमाची,
जाणीव तुझ्या गहिवरण्यात होती.
– प्रशांत सिनलकर
पुस्तके व अधिक वाचण्यासाठी –
* All Copyright Reserved *