हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)

भाग १३ – “सप्तपदी”


प्रस्तावना


एखाद्याचे प्रेम रंगणार असेल, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणतात. नियतीचा हा खेळ अजब रीतीने सतत चालूच असतो. घडणाऱ्या घटना आणि अंतरी बदलणारे भाव यांचा विलक्षण मिलाफ कधीमधी पाहावयास मिळतो. अधुऱ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी दोन जीवांची जन्मोजन्मी गाठ पडत असावी, असे वाटते.


ती ऐश्वर्याचा उपभोग घेणारी युवती असते; तर तो तिच्याकडे चाकरी करणारा भोळसट युवक असतो. तिचे प्रदोषव्रत आणि त्याची भेट यांची सुरुवात एकाच दिवशी होते. अपशकुनांच्या घटना घडत असतानाच त्यांच्या प्रेमाचा खडतर, पण गुलाबी प्रवास सुरू होतो.


तिच्या प्रेमाचे रंग बदलत असताना तीही अनाहूतपणे बदलत जाते. तिचे निर्णय आत्मघातकी ठरत जातात. घडणारा प्रकार त्याच्या आकलनापलीकडचा असतो; तरीही तो प्रत्येक गोष्टीत तिची साथ देत राहतो.


आणि एका क्षणी, ज्याला प्रेमाची पूर्तता किंवा पुनर्जन्म म्हणता येईल, ते येऊन पोहोचतात.


– प्रशांत सिनलकर