हिंदोळा (मराठी कविता संग्रह)

भाग १६ – ६ “एकमेव”


एका अनोळखी वळणावरती,

अनाहूत भेटलीस तू.

नकळत जाहलो सोबती,

भावली मनास तू.


रंगल्या आपल्या गुजगोष्टी,

अनोखी भासलीस तू.

झालीस माझी सखी,

माझ्यातही हरवलीस तू.


चालताना पायवाट जीवनाची,

सावली बनलीस तू.

प्रत्येक माझ्या सुख-दुःखाची

वाटेकरी झालीस तू.


जाणीव होता अंतरी,

अनोखी वाटलीस तू.

निरागस माझ्या प्रेमाची,

जोडीदार ऐकमेव तू.


– प्रशांत सिनलकर


संपूर्ण वाचण्यासाठी

छापील पुस्तक